Saturday, September 5, 2009

HAPPY TEACHERS' DAY!

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
********************
गुरु हा संत कुळीचा राजा
गुरु हा प्राणविसावा माझा
गुरुविण देव नाही दूजा
पाहता त्रिलोकी

गुरु हा सुखाचा सागरु
गुरु हा प्रेमाचा आगरु
गुरु हा धैर्याचा डोंगरू
कदाकाळी डळमळेना

गुरु वैराग्याचे मूळ
गुरु हा परब्रह्म केवल
गुरु सोडवी तत्काळ
गाठ लिंगदेहाची

गुरु हा साधकाशी साह्य
गुरु हा भक्तालागी माय
गुरु हा कामधेनु गाय
भक्ताघरी दुभतसे

गुरु घाली ज्ञानांजन
गुरु दाखवी निजधन
गुरु सौभाग्य देऊन
साधुबोध नान्दवी

गुरु मुक्तीचे मंडन
गुरु दुष्टांचे दंडन
गुरु पापाचे खंडन
नानापरी बरितासे

कायाकाशी गुरु उपदेशी
तारक मंत्र दिला आम्हासी
बाप रखुमाई राशि
ध्यान मानसी लागले